Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुक्यातील गावांना 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 1 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर - आ.बबनदादा शिंदे

पंढरपूर तालुक्यातील गावांना 2515 योजनेतून विविध विकास कामांसाठी 1 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर - आ.बबनदादा शिंदे 

             बेंबळे (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यामधील गावांतील गावाअंतर्गत मुलभुत सुविधा पुरविणेच्या राज्य सरकारच्या 2515 या योजनेतंर्गत विकासकामे करणे करीता ग्रामीण भागातील कामासाठी 1 कोटी 80 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती  आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

             याबाबत सविस्तर माहीती देताना आ.बबनदादा शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते  काँक्रीटीकरण करणे, वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रीटीकरण,खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार  करणे, सामाजिक सभागृह, हायमास्ट दिवा बसविणे या सारखी अनेक  विकासकामांसाठी  शासनाकडे निधी मिळणेसाठी  मागणी केलेली होती. त्यास राज्य शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील विविध गावच्या  विकास  कामासाठी 1 कोटी 80 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे  सहकार्य मिळाल्याचे सांगून  निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून  लवकरच ही कामे सुरू होणार असल्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी यावेळी सांगितले.

             माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेली पंढरपूर तालुक्यातील कामे होणार असलेली गावे  1)  पांढरेवाडी - (1)  वामन वाट ते टाकळी रस्ता (2 लाख), (2) कॅनॉल पाटी-पांढरेवाडी ते जाधववाडी - फाळके मळा रस्ता करणे. (2 लाख),(3) घोडके वस्ती ते संभाजीनगर रस्ता करणे. (2 लाख), (4) घोडके वस्ती ते लक्ष्मी मंदिर रस्ता करणे. (2 लाख) , (5) चिखलकर मळा ते खारे वस्ती रस्ता करणे. (2 लाख) अशी एकुण रक्कम रु. 10 लाख, 2) नेमतवाडी - नेमतवाडी ते शेवते शीव रस्ता रक्कम रु.10 लाख, 3) देवडे - रक्कम रु.10 लाख, 4) इश्वर वठार - रक्कम रु.10 लाख, 5) बाभूळगांव - रक्कम रु.10 लाख, 6) मेंढापूर - रक्कम रु.10 लाख, 7)  बार्डी  - रक्कम रु.10 लाख, 8) कान्हापूरी - रक्कम रु.10 लाख, 9) चिंचणी - रक्कम रु.10 लाख, 10) पेहे - रक्कम रु.10 लाख, 11) शेवते - रक्कम रु.10 लाख, 12) भोसे - रक्कम रु.10 लाख, 13) गुरसाळे - रक्कम रु.10 लाख, 14) व्होळे - रक्कम रु.10 लाख, 15) आढीव - रक्कम रु.10 लाख, 16) उंबरे (पागे) - रक्कम रु.10 लाख, 17) जळोली - रक्कम रु.10 लाख, 18) वाडी-कुरोली - रक्कम रु.10 लाख रुपये याप्रमाणे कामाचा  सामावेश आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments