Hot Posts

6/recent/ticker-posts

पडळकर - खोतांचा 'त्या' पैशात वाटा आहे का? याचा तपास यंत्रणेने करावा - महेश तपासे

 पडळकर - खोतांचा 'त्या' पैशात वाटा आहे का? याचा तपास यंत्रणेने करावा - महेश तपासे


          मुंबई (नासिकेत पानसरे):-   भाजपचे विद्यमान आमदार पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते त्यामुळे सदावर्तेने जमा केलेल्या पैशामध्ये या दोघांचा वाटा आहे का? याचाही तपास यंत्रणेने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

          सदावर्ते यांनी कामगारांकडून सुरुवातीला ५३० आणि नंतर ३०० रुपये जमा केले असा युक्तिवाद न्यायालयात झाला आहे. जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले असतील तर या पैशांचा आकडा फार मोठा होतो. रोखीत पैसे घेतले असतील तर रोख पैसे घेणे हा इन्कमटॅक्सच्यादृष्टीने गुन्हा आहे असेही महेश तपासे म्हणाले. 

          महामंडळाचे विलिनीकरण व्हावे याला कोर्टाने मान्यता दिली नाही. त्यामुळे पाच महिने कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले. हे आंदोलन चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होता आणि याला भाजपने समर्थन दिले होते याकडे महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments