Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ मतदारसंघात जास्तीत जास्त आरोग्य सोयी सुविधा मिळवून देणार- आ. माने यांची ग्वाही मोहोळ येथे आरोग्य मेळावा संपन्न

 मोहोळ मतदारसंघात जास्तीत जास्त आरोग्य सोयी सुविधा मिळवून देणार- आ. माने यांची ग्वाही मोहोळ येथे आरोग्य मेळावा संपन्न


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळू लागले आहेत. ठिक ठिकाणी असणाऱ्या आरोग्य वर्धिनी केंद्रांमुळे अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. येत्या काळात मोहोळ मतदारसंघासाठी आरोग्य विषयक जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळवुन देण्यावर माझा प्रामुख्याने भर राहणार आहे. अशी ग्वाही मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली.मोहोळ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य मेळावा शुक्रवार दि २२ रोजी मोहोळ येथे पार पडला त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार यशवंत माने बोलत होते.यावेळी पं स. सदस्य अजिंक्यराणा पाटील,नगरसेविका सिमाताई पाटील,जिल्हा शल्यचिकित्सा डॉ प्रदीप ढेले,गटविकास अधिकारी गणेश मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पाथरुडकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ पी. पी. गायकवाड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष कुंदन धोत्रे, भाजप शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर,  मुस्ताक शेख, सतीश काळे, प्रमोद डोके,हेमंत गरड, राजाभाऊ सुतार उपस्थीत होते.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवनकुमार शिंदे,डॉ. बाळासाहेब गवाड,गणेश धोत्रे यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments