महाराजस्व अभियानांतर्गत २९३ जात प्रमाणपत्रे तयार, ४२ दिव्यांगांना रेशन कार्डवर धान्य सुरू तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांची माहिती

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-अनुसूचित जाती आणि जमाती मधील समाज बांधवांना आवश्यक त्या कागदपत्राच्या अभावी जात प्रमाणपत्रे मिळण्यास बऱ्याचदा विलंब होतो. त्यामुळे सर्व घटकांमधील व्यक्तींना आशा प्रमाणपत्रांद्वारे विविध योजनांचा लाभ गतिमान प्रशासकीय प्रक्रियेने मिळायला हवे या संकल्पनेतून महाराजस्व अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यात राबविण्यात आलेल्या शिबिराच्या माध्यमातून एकूण २९३ जात प्रमाणपत्र दाखले तयार करण्यात येत असून लवकरच याचे वितरण प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील यांनी दिली.मोहोळ तालुक्याच्या महसूल सेवेतील मोहोळ, अनगर,टाकळी, सावळेश्वर, शेटफळ, पेनुर, नरखेड, वाघोली,कामती या नऊ मंडलामध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये ४२ दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग रेशन कार्डचे वितरण करून धान्याचे वाटप देखील सुरू करण्यात आले आहे. तर २६ समाजबांधवांना अनुसूचित जातीचे रेशन कार्डचे वितरण करण्यात आल्याची बेडसे-पाटील यांनी सांगितले.हे सर्व उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर व प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले आहेत. यासाठी स्वतः तहसीलदार प्रशांत बेडसे -पाटील,निवासी नायब तहसीलदार लीना खरात, महसूल नायब तहसीलदार भालचंद्र यादव, मोहोळचे तलाठी अनील बागल इत्यादी सह मोहोळ महसूल कार्यालयातील कर्मचारी बांधवांनी परिश्रम घेतले.
0 Comments