मोहोळ भाजपच्या वतीने राज्य सरकार विरोधात कंदील आंदोलन

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ शहर व मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यावर ओढवलेल्या लोडशेडिंग विरोधात मोहोळ तहसील ऑफीस समोर कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण. शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर. जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी महाविकास आघाडी सरकारने चालू केलेल्या लोडशेडिंग विरोधात खरपूस समाचार घेतला. व सरकारने हे थांबवले नाही तर भारतीय जनता पार्टी च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. व जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर. मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण. भाजपा मोहोळ शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर. विधानसभा अध्यक्ष दिलीप काका गायकवाड. जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव. तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील. अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्य उपाध्यक्ष नागेश मेजर क्षीरसागर. तालुका सरचिटणीस महेश सोहणी. मुजीब भाई मुजावर. औदुंबर वाघमोडे. अविनाश पांढरे. विशाल डोंगरे. द्रोणा लेंगरे. शहाजहान बागवान. भाउ सारोळकर. सोमनाथ व्यवहारे. ई. सह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक या आंदोलनास उपस्थित होते.
0 Comments