ब्राईट फ्युचर ॲकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक पथदर्शी मॉडेल ठरेल : सौ. मधुमतीताई प्रदीपदादा साळुंखे-पाटील

ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल ॲकॅडमी चा उदघाटन समारंभ संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):-मागील 2 वर्ष कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गुणवत्तापूर्ण सुविधा आणि सर्वांगीण शिक्षण देणे हे मोठे आव्हान आहे. यासह स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी ही,प्रयत्न होणे ही काळाची गरज लक्षात घेऊन अशा कठीण परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पुढाकार घेऊन मोठ्या धाडसाने सुरू केलेली ब्राईट फ्युचर ॲकॅडमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक पथदर्शी मॉडेल ठरेल आणि एक नवीन, प्रयोगशील उचललेले पाऊल विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला दिशा दाखवेल असा विश्वास राष्ट्रसंत भय्यूजी महाराज प्रणित भारतीय संस्कृती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. मधुमतीताई प्रदीपदादा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.सौ. मधुमतीताई प्रदीपदादा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल गुरुवार दि 21 एप्रिल रोजी सांगोला येथे नव्याने सुरू झालेल्या ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल ॲकॅडमीचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. सर्वप्रथम सौ. मधुमतीताई प्रदीपदादा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल ॲकॅडमी च्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना ब्राईट फ्युचर आयआयटी ॲकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. पियुषदादा साळुंखे-पाटील म्हणाले, ॲकॅडमी सुरू करण्याचा निर्णय 3 वर्षांपूर्वी घेतला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून ठेवण्यासाठी आज ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल ॲकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. सांगोला, मंगळवेढा, पंढरपुर, जत, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे धोरण ठरवून शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. निश्चित पणे येत्या चालू वर्षी ब्राईट फ्युचर ॲकॅडमी मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमधून वेगळेपण दिसून येईल. तसेच माझ्या आईच्या वाढदिवसानिमित्त सांगोला सारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभा राहत आहे याचा मोठा आनंद आहे. त्या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थी सर्वांगीण बाजूने सक्षम घडवण्यासाठी आमच्या सर्वांचा प्रयत्न राहील असाही विश्वास डॉ. पियुषदादा साळुंखे-पाटील यांनी दिला.यावेळी ॲकॅडमीचे सचिव अनिल येलपले म्हणाले, सांगोला, जत, मंगळवेढा, आटपाडी, पंढरपूर या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा इंजिनिअरिंग मेडिकल या क्षेत्रामध्ये उज्वल भवितव्य घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या भागामध्ये ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमीची नितांत गरज होती. ती गरज आज यशोजीवन एज्युकेशन प्रा लि. च्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. नववी, दहावी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमीच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असा विश्वास देत, ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी म्हणजे क्लासेस नसून विद्यार्थ्यांच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी आमच्यावर राहील. यामध्ये विद्यार्थ्यांचा एनसीइआरटी चा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. असे सांगत, सौ. मधुमतीताई प्रदीपदादा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभहस्ते ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी चे उद्घाटन झाले. हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे. यासह डॉ. पियुषदादा साळुंखे-पाटील यांच्यासोबत काम करायला मिळतंय हे मी माझं भाग्य मानतो. असे ही त्यांनी सांगितले.
अकॅडमी सुरू करण्यासाठी डॉ. धर्मराज बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी अकॅडमी सुरू करण्यासाठी एक चांगली वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे संयोजकांनी मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमासाठी डॉ. प्रदीपदादा साळुंखे-पाटील, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. नेहाताई पियुषदादा साळुंखे-पाटील, मनीषा येलपले, डॉ. धर्मराज बोराडे, जेष्ट पत्रकार वैजीनाथकाका घोंगडे, मुख्याध्यापक गणेश साखरे सर आदी उपस्थित होते.
0 Comments