जवळा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहास उत्साहात सुरुवात

सांगोला (कटूसत्य वृत्त):-जवळा ता. सांगोला येथे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती उत्सव सप्ताहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी उपस्थित सर्वांना दिपकआबांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी जवळा ग्रामपंचायत सदस्य सज्जन मागाडे व मागाडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
जवळा ता.सांगोला येथे दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध समाोपयोगी व प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. स्व.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी जवळा गावाला घालून दिलेला सामाजिक समानतेचा आदर्श मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील पुढे येऊन जात आहेत. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेला आपला देश सामाजिक असमानतेच्या जोखडात अडकला होता. अशावेळी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. हे सर्वप्रथम बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले. संपूर्ण जीवन उपेक्षित बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी वाहून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित केली. त्यांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर आज आपला खंडप्राय असलेला देश "आपण सारे बांधव आहोत" या भावनेने एकत्र आहे. बाबासाहेबांचे विचार हे चिरंतन राहतील त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून गोर-गरीब, दीन-दलित व वंचित आणि उपेक्षित बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण समाजकरण व राजकारणात सक्रिय आहोत. जवळा गावाला स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या सामाजिक समानतेच्या विचारांची परंपरा आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध समाजपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात याचा इतरांनी आदर्श घ्यावा असेही शेवटी दिपकआबा म्हणाले.
0 Comments