Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा कुर्डूवाडीत निषेध.!

 लोकनेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा कुर्डूवाडीत निषेध.!

शहर राष्ट्रवादीच्या वतीने कठोर कारवाई ची मागणी.!

          कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-देशाचे लोकनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी काही समाजकंटक माथेफिरूने दगडफेक केली या घटनेचा निषेध कुर्डूवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने नोंदविण्यात आला.

          उद्या आंदोलनकर्त्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी कार्यालय येथे नायब तहसीलदार रविकिरण कदम यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

          महाराष्ट्राचे लोकनेते पवार साहेबांचे घरावर अशाप्रकारे दगडफेक होणे अत्यंत निंदनीय कृत्य असून याचा कुर्डूवाडी शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दात निषेध करतो आहे पोलिसांनी या दगडफेकी मागील कर्ता-करविता कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

          यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे कुर्डूवाडी शहराध्यक्ष दत्ताजी काकडे, माजी शहराध्यक्ष तथा जनता बँकेचे चेअरमन अर्जुनराव बागल,ज्येष्ठ नेते प्रकाश गोरे,पक्षनेते संजय गोरे, निवृत्ती गोरे,अरुण काकडे,सूर्यकांत गोरे,हरी बागल,प्रा.आशिष रजपूत, महेश गांधी,अजित वायचळ,अनिल उघडे,बबलू कांबळे,देविदास कदम,दासू गोरे,आदींसह पदाधिकारीी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थिित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments