लखन कोळी युवा मंचच्या वतीने पाणपोई

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे करिता लखन भाऊ कोळी युवा मंचच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग कुरुल - रोड, क्रांति नगर भागात लखन भाऊ कोळी यांच्या संकल्पनेतून पानपोईची उभारणी करण्यात आली.कार्यक्रमाच्या मुख्य प्रसंगी महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तौफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ कोळी, प्रा. नरेंद्र कसबेकर, अमोल कोळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन फाटे, पप्पू कोळी, नागेश राऊत, सोनू आखाडे, दीपक कांबळे, पंकज कांबळे, योगेश भैय्या गायकवाड, योगेश ओहोळ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाणपोई च्या माध्यमातून पायी जाणाऱ्या वाटसरुंना थंड पाणी मिळावे याकरिता सामाजिक बांधिलकी ठेवून लखन भाऊ कोळी युवा मंचच्या माध्यमातून या भागात पाणपोईचे निमित्ताने विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. या त्यांच्या अनोख्या उपक्रमा बद्दल प्राध्यापक नरेंद्र कसबेकर यांनी युवा मंचचे भरभरून कौतुक करून अशा सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.पानपोइच्या उभारणी करता, सोमा कोळी, नागेश सरवदे, लक्ष्मण घाडगे, विशाल कोळी, चम्मू गोरवे, जावेद शेख, नवनाथ घोडके, रमेश शिंदे, नागेश भांगे, सपन राऊत, बाळा खरात, ताहीर कुरुलकर, प्रदीप घोडके, मोहित शेख, सोनू कोळी, सत्यवान लेंगरे, अरबाज इनामदार, दिपक मडिखंबे, नवनाथ कोळी, गुरुनाथ चव्हाण, सलीम मुजावर, अर्जुन चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments