Hot Posts

6/recent/ticker-posts

शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

             अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज संचलित शंकराव मोहिते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ चर्चगेट,मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्कार कु.स्वप्नाली दिलीप जाधव व शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार किरण तुकाराम भांगे या स्वयंसेवकांना देऊन सन्मानित करण्यात आले.

             राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये व महाविद्यालयाच्या बाहेर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक प्रबोधनाचे काम केले.यामध्ये राज्य व राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली येथील संचलनातील सहभाग,राष्ट्रीय एकात्मता शिबिर,आव्हान-आपत्ती व्यवस्थापन शिबिर,उत्कर्ष सामाजिक-सांस्कृतिक शिबिर,विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वच्छता अभियान व समाज प्रबोधन, निर्मल वारी-हरित वारी-निसर्ग वारी, रक्तदान शिबिर,वृक्षारोपण,मतदान जनजागृती,स्त्री भ्रूण हत्या,पराभव महापुरुषांच्या विचारांचा इ.पथनाट्य सादरीकरण करून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल,तसेच नीरा नदीतील गणेश मूर्तीचे पूनरविसर्जन व नदीपात्र स्वच्छता मोहीम,प्राचीन बारवांची स्वच्छता,शिवकन्या सखुबाई महादजी निंबाळकर समाधी स्वच्छता (माळशिरस) व संताजी घोरपडे समाधी स्वच्छता (इस्लामपूर) इत्यादी ठिकाणच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यावतीने सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्राप्त स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला.तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मनोज रेळेकर यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.

             या स्वयंसेवकांच्या यशासाठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख, प्र.प्राचार्य डॉ.दत्तात्रेय बागडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर ताटे-देशमुख, प्रा. दादासाहेब कोकाटे, डॉ.चंकेश्वर लोंढे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments