Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा काँग्रेसच्या आ.प्रणिती शिदेंच्या हस्ते होणार आज शुभारंभ

माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा काँग्रेसच्या  आ.प्रणिती शिदेंच्या हस्ते होणार आज  शुभारंभ

          माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील मित्रप्रेम मल्टीस्पेशालिटी  रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा २७ एप्रिलला आ.प्रणितीताई शिंदेच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती दादासाहेब साठे व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डाॅ.विकास मस्के यांनी पत्रकार परिषदेत   दिली.

          दोन्ही शासकीय  योजना सुरु होणारे हे माढा तालुक्यातील १ ले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय असुन किडनी, पोट, हाड, यासह अन्य गंभीर  प्रकारच्या सर्वच आजारावर या दोन्ही योजनेतून उपचार व शस्त्रक्रिया मोफत पार  पडणार आहेत.

          २७ रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आ.धनाजीराव साठे हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन कॉग्रेस(आय) चे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील असतील.

          कुर्मदास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिरीष पाटील,महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा शाहीन शेख,नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे यांची उपस्थिती असणार आहे.

          पिवळे व केशरी कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी दिड लाख तर प्रधानमंत्री योजनेसाठी ५ लाख रुपयाची मर्यादा  असणार आहे.आयसियु सह असे एकुण ४८  बेड तर डॉक्टर व कर्मचारी  असे  ३० जण  रुग्ण सेवेस कार्यरत आहेत. रुग्णालयाच्या  सुसज्ज इमारतीत मल्टि स्पेशालिटी उपलब्ध असलेल्या सुविधेसह आलेल्या रुग्णांना तत्पर रुग्णसेवेला प्राधान्य  दिले  जात  असल्याचे सांगुन  कोरोना काळात हजारो गोरगरिब रुग्णांना हे   रुग्णालय वरदान ठरले असल्याचे डाॅ.विकास मस्के यांनी आवर्जुन  बोलताना  सांगितले.पत्रकार परिषदेस नगरसेवक विकास साठे,अरुण कदम, नितीन साठे,समाधान राऊत,धनाजी वसेकर,चंद्रकात  कांबळे,हनुमंत राऊत,सुधीर लंकेश्वर आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments