वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने बसवजयंतीनिमित्त "बसव सप्ताहाचे आयोजन"

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत देशाच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिकि, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष महान तत्त्वज्ञानी समाजप्रबोधक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या वैशाख शुध्दपक्ष 3 शके 1944 अक्षयतृतीया 3 मे 2022 मंगळवार रोजी बसवजयंती निमित्त दि. 29 एप्रिल,30 एप्रिल, 1 मे, 2 मे व 3 मे रोजी विविध धार्मिक अध्यात्मिक व सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.सन 2022 च्या बसवजयंती नुतन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सिद्रामप्पा हुलसुरे, उपाध्यक्षपदी विरेंद्र हिंगमिरे, सचिवपदी बाळासाहेब देशमुख व कार्याध्यक्ष आनंद थळंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.29 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता बसव सप्ताहाचे चे "उद्घाटन ध्वजारोहन" करुन होणार आहे. तसेच तद्नंतर महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मुर्तीचे महापुजन शोभाताई बनशेट्टी,अमर बिराजदार, सुदीपजी चाकोते, एन. डी. जावळे मामा, ईरप्पा सालक्की मामा, केदारनाथ उंबरजे, शिवशरण आण्णा पाटील व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्या हस्ते होऊन सन 2022 महात्मा बसवेश्वर जयंतीच्या विविध संघटना, मंडळे व संस्थाच्या नुतन उत्सव अध्यक्षपदी निवड झालेल्या अध्यक्षांचे सन्मान सोहळा वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात संपन्न होणार आहे.30 एप्रिल 2022 शनिवार रोजी पहाटे 6.00 वा. सिध्देश्वर मंदिर परिसरात चिमणे पाखरांसाठी पानाडी (पाणपोई) व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच त्याचदिवशी सायं. 6.00 वा. गरीब व गरजू होतकरु फुटपाथवर व मंडईमध्ये उन्हातान्हात आपला व्यवसाय करणारे बांधवांना वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने "छत्री भेट" देण्यात येणार आहे. 1 मे 2022 रविवार रोजी सकाळी 8.00 वा. भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन शिवानुभव मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रकला स्पर्धा 1 ली ते 5 वी, 6 वी ते 10 व खुला गटात घेतले जाणार आहे. चित्रकला स्पर्धेत विजेता स्पर्धकांना प्रत्येक गटातून प्रथम क्र. 1501 रु. व्दितीय क्र.1001 व तृतीय क्र. 501 रु. बक्षीसे व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेचे बक्षीस माजी नगरसेवक व समाजभुषण कै. बापुसाहेब करजगीकर यांच्या स्मरणार्थ भिमाशंकर करजगीकर परिवारांच्या वतीने देण्यात येणार आहे.1 मे 2022 रोजी सकाळी 10.00 वा. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान च्या कार्यालयातील सिंहासनारुढ महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मुर्ती समोर 10 हजार हापूस आंबा व कलिंगड, टरबुज इतर फळांचे सजावट करण्यात येणार आहे.आरास महापुजा ष.ब्र.प. शिवाचार्यरत्न डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, ष.ब्र.प. रेणुक शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी मंद्रुप, श्री.ष.ब्र.प. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी महालिंगेश्वर बृहन्मठ नागणसूर,ष.ब्र.प. शिवपुत्र महास्वामीजी सिध्दारुढ मठ यांच्या अमृतहस्ते व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दत्तात्रय भरणे मामा यांच्या अध्यक्षतेखाली धर्मराज काडादी, सुभाष बापु देशमुख, विजयकुमार देशमुख मालक, सिध्दाराम म्हेत्रे, अॅड. मिलिंद थोबडे,दिलीप स्वामी,सुधीर खरटमल,सचिन कल्याणशेट्टी, धनराज पांडे, महेश कोठे,उदयशंकर पाटील, संतोष पवार,गुरुशांत धुत्तरगांवकर,राजशेखर शिवदारे, अॅड. बसवराज सलगर,माऊली पवार, अनंत जाधव,अजित गायकवाड,श्रीकांत (बापू) डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत "भव्य आंबा आरास" महापुजा संपन्न होणार आहे.सायं. 5.00 वा. श्री शंकरलिंग महिला भजनी मंडळाच्या वतीने "भजन संध्या" चे कार्यक्रम होणार आहे. सायं. 6.00 वा. बसवकालीन शरण व शरणार्थीचे “वेशभुषा स्पर्धा” चे आयोजन करण्यात आले आहे. वेशभुषा स्पर्धा 2 गटात घेतली जाणार आहे. 1 ली ते 8 वी (एक गट), 9 वी ते खुला गटा (2 रा गट), विजेता स्पर्धकांना प्रत्येक गटातून प्रथम क्र. 1501 रु. व्दितीय क्र. 1001 व तृतीय क्र. ५०१ रु. बक्षीसे व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. 2 मे 2022 सोमवार रोजी भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालय कुंभार वेस येथे करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे.जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हे 31 वर्षे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे वास्तव्यास होते व मंगळवेढ्यातूनच वीरशैव लिंगायत धर्माचा प्रचार व प्रसारास सुरुवात केली. मंगळवेढा येथे 'लोकशाही संसद' म्हणजेच 'अनुभव मंटपाची' स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्रित येऊन सामाजिक अडचणीवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. चला आपण सर्व सोलापूरकर पुन्हा एकदा एकत्र येऊन महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरा करुया. त्यांच्या चरणी सेवा अर्पित करुन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने बसवजयंती निमित्त आयोजित 'बसव सप्ताहात' सहभाग होऊन बसवजयंती आनंदोत्सवात साजरा करु या असे आवाहन बसवजयंती उत्सव अध्यक्ष सिद्रामप्पा हुलसुरे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस नुतन उत्सव अध्यक्ष सिद्रामप्पा हुलसुरे, नुतन उपाध्यक्ष विरेंद्र हिंगमिरे, नुतन सचिव बाळासाहेब देशमुख, नुतन कार्याध्यक्ष आनंद थळंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, उपाध्यक्ष प्रशांत धुम्मा, सचिव गुरुनाथ निंबाळे, संचालक कैलास मेंगाणे, संचालक कैलास जेऊरे, संचालक गौरव जक्कापुरे उपस्थित होते.
0 Comments