Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन

 माढ्यात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन 

          माढा (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंती माढा शहरासह ग्रामीण भागात देखील उत्साही वातावरणात साजरी झाली. माढा शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानच्या  वतीने मान्यवरांच्या वतीने अभिवादन झाले.

          राजरत्ननगर मधील  मध्यवर्ती भिमजयंती मंडळाच्या वतीने नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे;दौलतराव साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन झाले.यावेळी नगरपंचायतच्या महिला नगरसेविका तसेच अमर लंकेश्वर, किरण लंकेश्वर, रोहीत लंकेश्वर, कुंडलिक लंकेश्वर, धिरज कांबळे, भिमराव लंकेश्वर, आतिश ढावरे, सुभाष लंकेश्वर उपस्थित होते.

          डाॅ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात अभिवादन सोहळा पार पडला.कोरोना काळात गोरगरीब  रुग्णांना तारणाहार ठरलेल्या मित्रप्रेम रुग्णालयाच्या डाॅ.विकास मस्के यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी दादासाहेब साठे,अशोक जानराव, राहुल लंकेश्वर,नितीन साठे, रमेश थोरात,मिलिंद लंकेश्वर,सुधीर लंकेश्वर,अशोक माने,यशपाल लंकेश्वर  आदी उपस्थित होते.बि.बि.एस मित्रपरिवाराच्या वतीने  निळ्या ध्वंजाचे ध्वजारोहण नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दादासाहेब साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे,शिवाजी जगदाळे,अशोक जानराव,सुधीर लंकेश्वर,आण्णाराव खंडागळे आदी उपस्थित होते.पंचशील तरुण मंडळाच्या वतीने देखील इंदिरानगर येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा मीनल साठे,दादासाहेब साठे,झुंजार भांगे यांचेसह नगरसेवक उपस्थित होते.मोरया सोशल फौंडेशन च्या वतीने देखील सामाजिक उपक्रमांनी जयंती झाली.सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा,किरण घोंगडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.

          रक्तदान शिबिरासह अन्नदान उपक्रम राबविला.कवी फुलचंद नागटीळक यांचे एकपात्री प्रबोधनपर नाटक झाले.यावेळी संतोष रणसुरे,सचिन बगाडे,ओंकार पराडकर,विकास घोंगरे,अजिंक्य काटे,संतोष माने,अरविंद कदम,दिपक सुतार,मंगेश पाडूळे,राहुल नाईकवाडे आदी उपस्थित होते.छत्रपती शिवाजीमहाराज नगर मध्ये रमाई तरुण मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम झाला.यावेळी नवनाथ थोरात,जहीर मणेर,किरण पवार, रमेश थोरात,चंद्रकात कांबळे,विजय सरवदे,सचिन ढावरे,नागेश ढावरे,विशाल ढावरे,निती शिंदे,प्रशांत गायकवाड,सुमीत कंगले उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments