जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर ज्युनि.कॉलेजचे सुयश

अमोल अमुने १०००० मी.धावणे स्पर्धेत प्रथम
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी एस आर पी कॅम्प सोलापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वरिष्ठ मैदानी स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज इयत्ता अकरावी कला शाखेचा विद्यार्थी कुमार अमोल नानासो अमुने याने १०००० मीटर धावणे प्रथम क्रमांक व ५००० मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच या विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल सां.ता.शि.प्र.मंडळ,सांगोला सचिव म.शं. घोंगडे यांच्या हस्ते या गुणी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य भीमाशंकर पैलवान,उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक (क्रीडा नियंत्रक)पोपटराव केदार उपस्थित होते.
या यशस्वी खेळाडूला क्रीडा शिक्षक प्रा.डी के पाटील, प्रा.सचिन चव्हाण,सुनिल भोरे ,संतोष लवटे,सुभाष निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर यशस्वी खेळाडूचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं.घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत,सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य भीमाशंकर पैलवान,उपप्राचार्य गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,पर्यवेक्षक बिभीषण माने,अजय बारबोले,(क्रीडा नियंत्रक)पोपटराव केदार,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments