स्वाभिमानी डिजिटल व प्रिंट मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रवींद्र कांबळे तर सचिवपदी पांडुरंग पाटील यांची निवड

सांगोला (कटूसत्य वृत्त):-स्वाभिमानी डिजिटल व प्रिंट मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी रवींद्र कांबळे यांची तर सचिवपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी समाधान कांबळे व पवन बाजारे ,कार्याध्यक्षपदी नितीन होवाळ, सहसचिव वैभव काटे, कायदेविषयक सल्लागार ॲड. महादेव कांबळे, खजिनदारपदी प्रवीण सावंत तर सदस्यपदी जगन्नाथ साठे, किशोर म्हमाने, विकास वाघमारे, विकास गंगणे, अमोल महारनवर, संतोष साठे, शबिर मुलाणी, विश्वजीत गाडे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.अनेक दिवसांपासून वृत्तपत्राच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वृत्तपत्र व न्युज चॅनेल चे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. त्याच बरोबर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ताज्या बातम्या पोहोचवण्यासाठी डिजिटल मीडिया चे योगदान महत्त्वाचे आहे. या विषयाची दखल घेऊन स्वाभिमानी डिजिटल व प्रिंट मीडिया पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली. पुढील काळामध्ये या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील सामान्य लोकांच्या प्रश्नावरती ही संघटना चांगल्या पद्धतीने काम करणार असल्याचे मत नूतन तालुकाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
0 Comments