सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त): समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धा निवारण्यासाठी जनजागृती करणारे थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे उत्साहात साजरी करण्यात आली.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा करण्यात आली.या कार्यक्रमात प्रा.आडत पी.एम यांनी आपल्या मनोगतात,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या जोतिबा फुले यांना जनतेने महात्मा पदवी बहाल केली,त्यांचे भारतीय इतिहासातील व राष्ट्रीय विकासातील योगदान बहुमौलय आहे. स्त्री शिक्षण, समानता,अंधश्रद्धा-निर्मूलन, बालविवाह विरोध,अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन यासंबंधित त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे विचार मांडले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाविद्यालयतर्फे अल्पउपहार देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ.एम.जी.शिंदे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भारत गरंडे,प्रा.एन.एन.माळी,डॉ.एम.जी
समाजातील अनिष्ट रूढी परंपरा व अंधश्रद्धा निवारण्यासाठी जनजागृती करणारे थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे येथे उत्साहात साजरी करण्यात आली.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा करण्यात आली.या कार्यक्रमात प्रा.आडत पी.एम यांनी आपल्या मनोगतात,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती दिली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या जोतिबा फुले यांना जनतेने महात्मा पदवी बहाल केली,त्यांचे भारतीय इतिहासातील व राष्ट्रीय विकासातील योगदान बहुमौलय आहे. स्त्री शिक्षण, समानता,अंधश्रद्धा-निर्मूलन, बालविवाह विरोध,अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन यासंबंधित त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे विचार मांडले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाविद्यालयतर्फे अल्पउपहार देण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ.एम.जी.शिंदे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भारत गरंडे,प्रा.एन.एन.माळी,डॉ.एम.जी
0 Comments