बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतात मोटार चालू करण्यासाठी घरातून निघून गेलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील जामगाव येथे घडली आहे.
या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही.
सूरज केशव आवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने अकिकडेच बारावीची परिक्षा दिली होती. सूरजच्या आत्महत्येची माहिती कळाल्यावर त्याच्या कुंटुंबीयांनी शेतात धाव घेतली त्यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला सूरज लटकलेल्या स्थितीत दिसून आला त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनेसाठी पाठवला. या घटनेची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
0 Comments