Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहण समारंभ

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी ध्वजारोहण समारंभ

पुणे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त रविवारी 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर येथे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ होणार आहे.राष्ट्रध्वजास मानवंदना व पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्या संयुक्त संचलनाचा शासकीय समारंभ होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रसंगी मानवंदना स्वीकारतील.पुणे शहरातील सर्व केंद्र तसेच राज्य शासनाचे विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रमुख, कार्यालयीन प्रमुख व पुणे शहरातील विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी समारंभास सकाळी 7.45 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.दरम्यान निमंत्रितांना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 7.15 ते 9 वा. या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास, संस्थेला आपला ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 वा. पूर्वी किंवा 9 वा. नंतर आयोजित करावा, अशाही सूचना खराडे यांनी दिल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments