Hot Posts

6/recent/ticker-posts

महंगाई मार डालेगी! पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरच्या भाववाढीचा भडका; पहा आता किती द्यावे लागणार पैसे?

 महंगाई मार डालेगी! पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलेंडरच्या भाववाढीचा भडका; पहा आता किती द्यावे लागणार पैसे?

नवी दिल्ली (वृत्त सेवा):- जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढी होताना आता पाहायला मिळत आहेत. देशातही आता सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान, यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दूधाचा दर २ ते ५ रुपये प्रतिलीटर वाढवला होता. त्यामुळे ही वाढती महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला भार देत आहेत. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. याआधी ६ ऑक्टोबर २०१९ ला हा दर वाढवण्यात आला होता.दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. याआधी ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही एलपीजीचा दर वाढला असून आता ८९९ रुपये ५ पैशांच्या जागी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. चेन्नईत हा दर ९६५ रुपये ५ पैशांवर आहे.पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर वाढून ९७६ रुपये झाला आहे. याआधी हा दर ९२६ रुपये होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दर ९३८ वरुन थेट ९८७ रुपये ५ पैसे झाला आहे. देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे.राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच २२ मार्च २०२२ ला पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैशांवरुन वाढत प्रतिलीटर ९६ रुपये २१ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ८६ रुपये ६७ पैशांवरुन ८७ रुपये ४७ पैशांवर पोहोचला आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.

Reactions

Post a Comment

0 Comments