माढ्यात गुरुवारी मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदु शस्रक्रिया शिबिर,पालकमंत्री दत्तात्रय भरणेसह मान्यवरांची राहणार उपस्थिती
माढा (कटूसत्य वृत्त):-माढ्यात मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदु शस्रक्रिया शिबिर गुरुवार दि.२४ मार्च रोजी माढ्यातील स.म.गणपतराव साठे जि.प.प्रशालेत माढेश्वरी अर्बन बॅकेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती बॅकेचे अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे व उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी दिली.सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घघाटन सोलापुरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रमुख हस्ते तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत.करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे,माजी आ.धनाजीराव साठे,डाॅ.तात्याासाहे लहाने,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे,पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे,तहसीलदार राजेश चव्हाण,सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा,जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.प्रदीप ढेले,जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नेत्ररोगतज्ज्ञ डाॅ.तात्याराव लहाने व डाॅ.रागिणी पारेख यांच्या वैद्यकिय टिमच्या उपस्थितीत मोफत मोतिबिंदु शस्रक्रिया पार पडतील.यंदाचे शिबिराचे १४ वे वर्ष असुन आता पर्यंत ५२५८ रुग्णांची मोतिबिंदु शस्रक्रिया झाल्या आहेत.शिबीराचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी केले आहे.
0 Comments