टेंभुर्णीच्या चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीच्या ०७ धनुर्धरांची राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेसाठी निवड
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभूर्णी येथील चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीच्या ०७ धनुर्धरांची दि.२४ ते २७ मार्चला महाड (रायगड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाड येथे ११ वी राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धा दि.२४ ते २७ ला संपन्न होणार आहेत या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात कुणाल अगरकर,निशांत क्षिरसागार,रवि घाडगे व हर्षदा पवार तर १७ वर्ष वयोगटात तुषार घाडगे ,रत्नतेज शिरसट तर सिनिअर गटातून सुहास शिंदे यांची निवड झाली आहे.मोडनिंब येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फिल्ड इनडोअर आर्चरी स्पर्धेत वरील खेळाडूंनी सुवर्ण,रौप्य पदके पटकावली आहेत.सर्व यशास्वी खेळाडूंना चॕम्पियन्स आर्चरी अॕकेडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा.रमेश शिरसट यांचे मार्गदर्शन लाभले तर खेळाडूंचे पं.स.सदस्य धनराज शिंदे यांनी आभिनंदन व शुभेच्छा दिल्या. यावेळी पवळे गुरुजी,योगेश घाडगे,अभिजीत माने,पालक यांनी आभिनंदन केले.
0 Comments