Hot Posts

6/recent/ticker-posts

एस के एंटरप्रायजेसचा दराराच न्यारा,लाखोंची कामे "मँनेज"करुन मिळवली;'सांगोला पंचायत समिती गटविकास अधिकारी मात्र मौनात'

 एस के एंटरप्रायजेसचा दराराच न्यारा,लाखोंची कामे "मँनेज"करुन मिळवली. 
'सांगोला पंचायत समिती गटविकास अधिकारी मात्र मौनात'


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुलभुत सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे.मात्र सांगोल पंचायत समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पंचायत समिती अखत्यारीत येत असलेल्या पाणीपुरवठा उप विभागाने ग्रामपंचायतीसाठी वॉटर अक़्वाच्या कामाची कोणत्याही  वर्तमानपत्रात ई-टेंडरची निविदा प्रसिद्धी न करता पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी यांनी संगनमत करून आणि अर्थपूर्ण वाटाघाटी करून पाणीपुरवठ्याची आरो वाटर प्लान्ट  चे टेंडर प्रक्रिया सांगोला येथील एस के एंटरप्रायजेसने आर्थिक देवाण घेवाण करुन मिळवली असल्याची लेखी तक्रार सुनिल केदार यानी केली असून नियम बाह्य टेंडर  प्रक्रिया रद्द करावी व नव्याने टेंडर प्रक्रिया करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा  दिला आहे.

        

         टेंडर मुदत सात  दिवसाची असताना सदर  टेंडर साठी पाच दिवसांची मुदत दिली असून सदर टेंडर किमान दहा दिवसाचे करायला हवे होते,असा अपवाद असताना खुर्च्या टाकून ज्या ठेकेदाराना काम द्यायचे नाही अशा  ठेकेदारांची अडवणूक केली जात आहे.सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग येथून शंभर रुपयांच्या बॉन्डवर  सही घेण्यासाठी ठेकेदारास टाळाटाळ 

केल्यामुळे मर्जितील ठेकेदारास काम मिळवून देण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी आणि गटविकास अधिकारी,पाणी पुरवठा उपअभियंता यानी आटापिटा केला असल्याचा आरोप केदार यानी केला आहे.


         एस के एंटरप्रायजेस या ठेकेदारानी तालुक्यातील  एका गावात वॉटर अक्वाचे काम दोन महिने अगोदरच केले असून सदर कामाची  इ निविदा मात्र मागील चार दिवसात  प्रसिध्द केल्याचा प्रकार समोर आला  असून त्या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत असून जर हे काम नाही, थांबवले तर आंदोलन करण्याच्या तयारीत अनेक गावातील नागरिक आहेत. तसेच या सर्व कामाची नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी अशी मागणी करण्यात आली.


Reactions

Post a Comment

0 Comments