प्रतिकुलतेवर मात करत यश मिळवणे ही साधनाच - प्रा.प्रबुद्धचंद्र झपके
विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी संतोष चव्हाण सत्कार समारंभ

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी संतोष चव्हाण दोन वर्षाचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले होते.परंतु प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करत जिद्द व अभ्यासातील सातत्य याद्वारे एमपीएससी परीक्षेत यश मिळविले व संपूर्ण महाराष्ट्रात ११७ व्या क्रमांकाने पास होऊन पोलीस उपनिरीक्षक झाला हे यश म्हणजे प्रतिकुलतेवरती मात करण्यासाठी केलेली साधनाच होय असे प्रतिपादन
सां.ता.शि.प्र.मंडळ अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले माजी विद्यार्थी संतोष चव्हाण सत्कार समारंभामध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते होता.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक बिभीषण माने,अजय बारबोले,पोपट केदार उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.झपके म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी संतोष चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण केले तर निश्चित यश मिळेल.असे सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील भोरे यांनी केले.सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.सौ.माधुरी पैलवान यांनी केले.
पोलीस उपनिरीक्षकपदी अंतिम निवड होईपर्यंत अनेक अडचणींवर मात केली.परंतु कष्ट करण्याची तयारी असेल तर यश मिळते.मला सांगोला विद्यामंदिर मधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा व शाळेच्या नावलौकिकाचा वेळोवेळी फायदा झाला.- नुतन पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण
0 Comments