शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एसएफआय कडून ई-मेल करो आंदोलन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया - (एसएफआय) सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मध्ये गेल्या 17 मार्च पासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहे.हिवाळी 2021 - 22 सेमिस्टर परीक्षा बॅक या प्रमुख मागणी सोबतच महाविद्यालयातील परिसर स्वच्छता प्रश्न, पिण्याचे पाणी प्रश्न, कॅंटीनचे दुरावस्था (उपहारगृह) मुलींचे वस्तीगृह, मुलांचे वस्तीगृह, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल चे साहित्य, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर लॅब, टेकस्टाईल विभाग, शौचालयचे प्रश्न अशा सर्व मागण्यांना घेऊन एसएफआय आंदोलन करत आहे. फक्त आंदोलनच नाही तर महाविद्यालयच्या प्राचार्य, MSBTE, निवासी उपजिल्हाधिकारी असे सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा या सर्वांकडून जाणूनबुजून विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.यामुळे आज राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि एम.एस.बी.टी.ई पुणे, मुंबई विभागाला ई-मेल करो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.यावेळी एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जि.क.सदस्य प्रभुदेव भंडारे, प्रसन्न शिवणकर, गणेश लोखंडे, कृष्णा उगळे, सागर धर्मसाले, नितीन कमळे, रोहित खुने, रिहान सय्यद, सुहास झिझुरटे, शैलेश लोकरे, विश्वजीत क्षीरसागर आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मल्लेशम कारमपुरी
SFI जिल्हा सचिव
8605727545
0 Comments