फार्मसी क्षेत्रात महिलांना रोजगारांच्या भरपूर संधी व वाव : डॉ.दिलीपकुमार इंगवले
विविध कार्यक्रमाने सह्याद्री फार्मसीत आंतरराष्टीय महिला दिन उत्साहात साजरा
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.आंतरराष्टीय महिला दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेऊन महिला दिन उत्साहात साजरा केला. सकाळच्या सत्रात वृक्षसंवर्धन हा उपक्रम घेण्यात आला.या उपक्रमात महाविद्यालयात असणाऱ्या सह्याद्री वनराई मधील विविध प्रकारच्या वृक्षांचे सर्व विद्यार्थ्यांच्या व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षांचे संवर्धन केले. सह्याद्री वनराई मधील विविध प्रकारच्या वृक्ष संवर्धनाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.दुपारच्या सत्रात महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात वकृतव व निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यास विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. महिला दिनानिमित्त महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरवात झाली.या कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर यांनी आपल्या मनोगतात महिलांचे यशस्वी जीवनातील योगदान व महत्व विशद करून फार्मसी क्षेत्रात महिलांना रोजगारांच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्याचा सर्वानी लाभ घ्यावा असे सांगितले.प्राध्यापिका पी.एम.आडत,विद्यार्थिनी कु.शिवानी भुसे,कु.मनोरमा नाईकनवरे कु.तेजा मेटकरी,कु.पूजा दबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी आपल्या मनोगतात महिलांचे शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,ऐत्या सिक जीवनातील योगदान व महत्व विशद करून फार्मसी क्षेत्रातील प्रगतीमध्ये महिलांना असणाऱ्या संधी व अभ्यासक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रा. व्ही.पी.आणेकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.एम.जी.शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.भारत गरंडे, प्रा.एन.एन.माळी,डॉ.एम.जी.शिंदे ,प्रा.कोळी आर.एम यांचे योगदान लाभले.
0 Comments