Hot Posts

6/recent/ticker-posts

नबाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत भव्य मोर्चा: आ.शेलार यांची महिती

 नबाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मुंबईत भव्य मोर्चा: आ.शेलार यांची महिती

 
                                                     
 


              


मुंबई (कटूसत्य वृत्त):- अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पायऱ्यांवर बसून ही कारवाई पुर्ण व्हावी यासाठी मागणी केली.आता मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचा उद्या मुंबईत विराट मोर्चा असल्याची माहिती भाजपाचे आशिष शेलार यांनी दिली आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही तरीही भाजप मोर्चा काढणार असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.लाचारीसाठी राजीनामा घेत नाहीत न्यायालयही नवाब मलिक यांच्या प्रकरणात सक्षमपणे काम करत आहे. मात्र केवळ लाचारीसाठी सरकारचे मंत्री हा राजीनामा घेत नाहीत. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यात सामील असल्याचं दु:ख होतं आहे. आपासून पालिकेवर आयुक्त राज सुरू झाले आहे. भ्रष्टाचाराचे राज्य बाजूला जाईल अशी अपेक्षा आहे. एक कोटी ४० लाख मुंबईकरावर दोन लाख कोटी रुपये खर्च केले असे शिवसेना सांगत आहेत. स्थायी समिती अध्यक्षांच्या बेनामी संपत्ती वाढली आहे. त्यांनी जाता जाता देखील डल्ला मारला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Reactions

Post a Comment

0 Comments