Hot Posts

6/recent/ticker-posts

खाजगी शाळेतील शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्ययोजनेचा लाभ मिळवून देणार - बच्चू कडू

 खाजगी शाळेतील शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्ययोजनेचा लाभ मिळवून देणार - बच्चू कडू 


मुंंबई,(कटूसत्य वृत्त):- राज्यातील खाजगी शाळांमध्ये शिक्षकांना कमी वेतन मिळत असल्याचा मुद्दा शिक्षक आमदारांनी विधान परिषदेत लावून धरला. किमान वेतनही मिळत नसल्याची बाब शिक्षकांच्या अनुषंगाने आमदारांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षकांना किमान वेतनापेक्षा समान वेतन देण्याची मागणीही आमदारांकडून करण्यात आली. खाजगी शाळेतील ज्या शिक्षकांना पगार अत्यल्प असल्यामुळे राज्यातील त्या खाजगी शाळांचा आढावा घेऊन यांमध्ये किमान वेतन किती असावे याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. तसेच हा निर्णय होईपर्यंत कमी वेतन असणाऱ्या शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशीही मागणी दरेकर यांनी  केली.  या दोन्ही मागण्यांचा सकारत्मक विचार करण्यात येईल. ज्या खाजगी शाळा शिक्षकांना अत्यल्प वेतन देतात अशा शाळांची चौकशी करण्यात येईल, तसेच शिक्षकांच्या वेतनाचा निर्णय होईपर्यंत दरम्यानच्या काळात या शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही आश्वासनही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत दिले. राज्यात खाजगी शाळेतील शिक्षकांना किमान वेतनापेक्षा समान वेतनाची मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली. सध्या शिक्षकांना किमान वेतन देण्यात असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. तर शिक्षकांना वेतन देण्यात येत नसून ते मानधन देण्यात असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. भाजपचे रवींद्र पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर बोलताना बच्चू कडू यांनी सभागृहात खाजगी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी अनेक सदस्यांनी आपले मत मांडले. राज्यातील खाजगी शाळांच्या शुल्क वाढीवर नियंत्रण ठेवण्याबात उपस्थित करण्यात आला, त्यावेळी बोलतना दरेकर यांनी सांगितले की, खाजगी शाळांची नावं मोठी मात्र शिक्षकांचा पगार अत्यल्प आहे. अगदी सात ते आठ हजार इतक्या तुटपुंज्या पगारात हे शिक्षक ज्ञान दानाचे पवित्र काम करीत आहेत. कमी वेतन घेणाऱ्या या शिक्षकांची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून, शिक्षकांचे वेतन कमी असल्यास त्यांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्भाव करावा. यामुळे शिक्षकांना आर्थिक हातभार लागेल व मदत होईल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. खाजगी शाळेतील शिक्षकांचे किमान मानधन ठरविण्यासाठी विचार करण्यात येईल करु. तसेच अत्यल्प पगार असणाऱ्या शिक्षकांना किमान वेतन कायदा लागू होतो का ते पाहू. कमी उत्पन्न असणाऱ्या शिक्षकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येईल.पुढील अधिवेशनापर्यंत कोणती खाजगी शाळा किती वेतन देते किती वेतन द्यायला हवे याचा निर्णय घेण्यात येईल असेही राज्यमंत्री कडू यांनी  स्पष्ट केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments