कुरुल ते पंढरपूर मार्गासाठी २० कोटींचा विशेष निधी मंजुर
_मुंबईत सा. बां.मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या दालनात बैठक_
_आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्याला यश_
मोहोऴ (कटूसत्य वृत्त):- कुरुल ते पंढरपूर या मार्गाच्या दुरूस्तीसाठी तातडीने २० कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी दिली आहे अशी माहीती मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली. पुढील टप्प्यात उर्वरित तीस कोटी चा निधी देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिली असून त्यामुळे या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावरून भरीव निधी मिळावा यासाठी आमदार यशवंत माने यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. काल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना.अशोक चव्हाण,आमदार बबनदादा शिंदे,आमदार यशवंत माने व राज्याचे मुख्य सचिव आणि बांधकाम विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्यात मुंबई येथे बैठक संपन्न झाली.
0 Comments