महिलांचा सन्मान करणे हा प्रगतीचा मार्ग- नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे,वेताळवाडीत महिलांसाठी स्पर्धां संपन्न
माढा (कटूसत्य वृत्त):- महिलांचा समाजात सन्मान करणे हा प्रगतीचा मार्ग आहे.केवळ मुल आणी चुल यात महिलांनी अडकुन न राहता व्यापिक दूरदृष्टी ठेऊन समाजात कार्यरत राहिल्यास त्या आत्मनिर्भर बनतील असे मत माढ्याच्या नगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड मीनल साठे यांनी व्यक्त केले.वेताळवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावात महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ पार पडला.यावेळी अॅड.मीनल साठे महिलांना मार्गदर्शन पर बोलत होत्या.प्रारंभी महिला मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेताळवाडीच्या सरपंच डॉ.रजनी सुरवसे होत्या.प्रास्ताविकातुन सरपंच सुरवसे यांनी गावात आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला.जि.प.शाळेतील मुलींनी स्वागत गीत व सावित्रीच्या ओवी गायिल्या.विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महिलांच्या व्यवसायिक कौशल्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी व प्रेरणा मिळण्यासाठी महिलांनी स्वतःह बनविलेले कलाकौशल्य चे साहित्य तसेच शेतीमाल व खाद्यपदार्थांचे स्टॉल ठेवण्यात आले होते.यावेळी मंचावर उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेविका सुनिता राऊत,गितांजली देशमुख,रणदिवेवाडी च्या सरपंच सखुबाई पवार, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी जाधव,सुनिता सुरवसे,रतन सुरवसे,ग्रामसेवक मनीषा शेंडेकर,मनीषा सुरवसे,कौशल्या खोत यांचेसह गावातील महिलासह महिला बचत गटाच्या महिला सदस्या उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल रवि सुरवसे यांनी केले.आभार प्रा.रवि सुरवसे यांनी मानले
0 Comments