धनंजय दिनकर पाटील यांनी सोलापूर जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी म्हणून स्वीकारला पदभार
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- धनंजय दिनकर पाटील राहणार उजनी ते तालुका माढा यांनी सोलापूर जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी म्हणून पदोन्नतीने पदभार स्वीकारला आहे त्यांचे स्वागत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आहे.धनंजय पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणाहून पदोन्नतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी म्हणून बदली झाली आहे.यावेळी सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील,चंद्रकांत मंगरुळे,दादासाहेब पवार, कृषी पर्यवेक्षक संघटनेचे सोलापूर जिल्ह्या अध्यक्ष संजीव जवळकोटे,उपसंचालक मोरे,फिनोलेक्स सोलापूर जिल्हा एरिया मॅनेजर प्रमोद मेटे-पाटील तसेच तंत्र अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते
0 Comments