खताळ हे दिलदार मनाचे, दमदार नेते होते - बाळराजे पाटील

140 रक्तदात्यांनी केले खताळ यांना अभिवादन
सोलापूर (कटुसत्य वृत्त):-येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच हसत स्वागत करत, त्याच्या समस्या जाणून घेणे ,आणि त्यावर मार्ग काढणे, वेळप्रसंगी आर्थिक मदत करून त्यांना दिलासा देणे अशा विविध पैलूच्या माध्यमातून तानाजीराजे खताळ यांनी समाजकारण राजकारण, स्वतःचा उद्योग व्यवसाय संभाळत जनतेची सेवा केली .तानाजी राजेसारखा दिलदार मनाचा दमदार नेता पुन्हा होणे नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते बाळराजे पाटील यांनी व्यक्त केले.लांबोटी येथील हॉटेल जय शंकरच्या प्रांगणामध्ये खताळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील हे बोलत होते.लांबोटी पंचक्रोशीतील 140 रक्तदात्यांनी रक्तदान करून खताळ यांना अभिवादन केले. अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात रक्तदानाने करण्यात आली. सकाळी दहा वाजता भजन, दुपारी बारा वाजता पुण्यतिथीनिमित्त पुष्पअर्पण, लांबोटी, शिरापूर, कोळेगाव आधी गावच्या भारुडकारणी भारुडाचे सादरीकरण केले, भजन,भारुड, व रक्तदान आशा विविध कार्यक्रमांनी लांबोटी पंचक्रोशीतील नागरिकांनी तानाजीराजे खताळ यांना अभिवादन केले. अक्षय ब्लड बँकच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. यावेळी विक्रांत (बाळराजे) पाटील, माऊली हळणवर, अनिकेत हळनवर, सज्जन पाटील, धनाजी गावडे, गणेश खताळ, अक्षय खताळ, रुद्राक्ष खताळ, अनिरुद्ध खताळ, संग्राम खताळ, बाबा धोत्रे, राजेश पाटील, प्रताप अलदर, ब्रम्हदेव गोफने, कृष्णकांत चव्हाण, अशोक कांबळे, किशोर मारकड, बाळासाहेब व्यवहारे ,हरी नगरे, तुकाराम खांडेकर, आनंद गावडे, परमेश्वर काळे, आबा चव्हाण, किरण वाघमोडे, सचिन सुरवसे, शिवाजी पासले, सुभाष चंदनशिवे, नितीन चंदनशिवे आदींसह राजकीय सामाजिक उद्योग - व्यवसाय,क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments