Hot Posts

6/recent/ticker-posts

१० दिवसांत पेट्रोल, डीझेल ६.४० रूपयांनी महागले; आणखी दरवाढ होणार?

 १० दिवसांत पेट्रोल, डीझेल ६.४० रूपयांनी महागले; आणखी दरवाढ होणार?

नवी दिल्ली (वृत्त सेवा):-  सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी ८०  पैशांची वाढ केली. इंधन दरवाढीचे सत्र कायम राहिल्याने अवघ्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डीझेल ६  रूपये ४० पैशांनी महागले.सार्वजनिक कंपन्यांनी साडेचार महिने दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये कुठला बदल केला नव्हता. त्यानंतर २२ मार्चला सर्वप्रथम दरवाढ झाली. तेव्हापासून ९ वेळा पेट्रोल आणि डीझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. ती दरवाढ संपूर्ण देशात लागू आहे.मात्र, स्थानिक कराची आकारणी भिन्न प्रमाणात होत असल्याने राज्याराज्यांतील दरवाढ वेगवेगळी असते. इंधनांच्या दरांमध्ये मोठी वाढ होत असल्याने महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments