Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला दिनी नगरपालिकेत शुद्ध पाण्यासाठी महिलांनीच फोडला टाहाे

 महिला दिनी नगरपालिकेत शुद्ध पाण्यासाठी महिलांनीच फोडला टाहाे 



कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील महिंगडे गल्लीतील भुयारी गटार फुटल्याने ते घान पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने तेथील नागरिकांना गेले तीन महिने झाले नळाला अशुद्ध पाणी येत आहे.येथील महिलांचा अंत संपल्याने महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून कुर्डुवाडी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढून शुध्द पाणी मिळन्या साठी टाहाे फाेडला.कुर्डूवाडी शहरातील मूळ गावठाणात महिंगडे गल्ली येते या ठिकाणी भुयारी गटार योजनेची कामे झालेली आहेत.भुयारी चा अंतिम तपासणी अहवाल न घेताच बांधकाम विभागाने त्यावर पेविंग ब्लॉक रस्त्याचे काम देखील करून घेतले आहे.आता ते रस्ते खोदल्या शिवाय भुयारी गटारी पाईप लाईन व पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनची लिकेज काढता येनार नाही.हे मात्र त्रिकाल सत्य आहे.भुयारी गटारीचे कामाची अंतिम तपासणी न केल्यामुळे भुयारी च्या मैंला युक्त पाण्याची पाईप लाईन व पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन जवळपास असल्यामुळे काम करताना दोन्ही ही पाईपलाईन लिकेज झाल्या असाव्यात व ते पाणी मुरून शेवटी नाळाला येत आहे.येथील चेंबर वारंवार तुंबून ही पाणी वरुन वाहते आहे.यामुळे येथील नळाला येनारे गाळ व मैंलायुक्त मिश्रीत अशुद्ध पाणी पिऊन नागरिकांची तब्येत बिघडू लागलेले आहे.येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कुर्डूवाडी नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत गेली तीन महिने सांगून झाले तरी यात काही मिळत नसल्यामुळे त्यांनी तिकडे कानाडोळा केलेला आहे.असा आरोपी ही स्थानिक नागरिकातून करण्यात आला आहे या भागातील लोक प्रतिनिधींना सांगुनी त्यांचे नगरपालिकेत कुणी ऐकत नाही अशीच परिस्थिती झालेली आहे.त्यांनीही हात टेकले यामुळे येथील महिलांनी शेवटी रणरागिनीचे रुप घेवून नगर पालिकेवर धडक मोर्चा काढला व तेथे येऊन एकच दंगा केला.शुद्ध पाणी मिळण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यां पुढे जोरजोरात घोषणा दिल्या.शेवटी नगर पालिकेच्या पाणी पुरवठा अभियंता कोमल वावरे यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले व लवकरात लवकर शुद्ध पाणी देण्याचे या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
 यावेळी या शिष्टमंडळात रुपाली रमेश मोहिते,प्रियंका योगेश महिंगडे, विजया गारख महिंगडे,मिरा संदीप हराळे,वैशाली शंकर शिंदे,अनिता प्रल्हाद अलदर,शालन गणेश अलदर, साधना विजय महिंगडे,मीनाक्षी रमाकांत सलगर सह महिला मोठ्या संख्यने उपस्थित हाेत्या.यावेळी या महिला सोबत शंकर बागल,सजन्न लोंढे,आकाश तरंगे,फिरोज खान,बंडू टाेणपे,तानाजी सलगर,उपस्थित हाेते.

Reactions

Post a Comment

0 Comments