महापुरुष व संतांच्या स्मृती जपण्यासाठी समिती व धोरण ठरवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 23, 2022

महापुरुष व संतांच्या स्मृती जपण्यासाठी समिती व धोरण ठरवा

 महापुरुष व संतांच्या स्मृती जपण्यासाठी समिती व धोरण ठरवा

  महाराष्ट्रातील युवकांचे  मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र तसेच देशाला दिशा देणारे महापुरुष तसेच संतांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच विडंबना थांबविण्यासाठी राज्य सरकारने विशेष समिती नियुक्ती करून सर्वंकष धोरण ठरवावे अशी मागणी महाराष्ट्रातील तरुण युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देवून केली आहे.महाराष्ट्रासह देशाला दिशा देणा-या अनेक महापुरुष तसेच संतांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती  शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माता जिजाऊ  महात्मा फुले, सावित्रीमाई फुले,या महापुरुष व महामातांसह संत गाडगेबाबा, संत तुकाराम,संत तुकडोजी महाराज यासारख्या अनेक महापुरुष आणि संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली असून त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दिशा देण्याचे उत्तुंग कार्य केलेलं आहे यांच्यासह उभारण्यात आले आहेत. मात्र या वास्तूंची नियमित सफाई तसेच डागडुजी होत नसल्याने अस्वच्छतेमुळे या वस्तू धूळ खात असून  एकप्रकारे हि त्यांची विडंबनाच  असल्याची नाराजी विक्की शिंगारे,अशोक कांबळे, नितिन पगारे,आशिष तांबे,दिनेश जाधव,शशांक कांबळे,सुमेध भिंगारदिवे,शिवराज रामपुरे,प्रतिक वाघ यांच्यासह  महाराष्ट्रातील  अनेक युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामाजिक न्याय  मंत्री धनंजय मुंडे ,कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  तसेच   मुं बईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांना  दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.देशाला समग्र दिशा देवून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविणाऱ्या महाराष्ट्रातील या सर्व महापुरुष आणि संतांच्या प्रेरणादायी इतिहास चिरकाल ठेवून त्यांच्या स्मृती भावी पिढी ला प्रेरणादायी ठरण्यासाठी राज्य सरकारने एका विशेष समितीची स्थापना करावी, महापुरुष व संतांच्या पुतळ्यांची गणना करून डाटा तयार करावा सर्व पुतळे व परिसराची किमान प्रत्येक आठवड्याला स्वच्छता करावी,तसेच सर्व पुतळ्यांची व परिसराची तातडीने दुरुस्ती करावी अशा मागण्या या युवकांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages