चतूर पक्षाची शिकार करताना एकजण ताब्यात वन विभागाची कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माढा-वैराग रोडवर वन विभागाचे पथक फिरती करत असताना सुर्डी मालवंडी हद्दीत चतुर पक्षाच्या शिकारीसाठी जाळे लावताना दशरथ रंगनाथ आडे (वय 41 रा. शिरढोण तांडा ता. कळंब जि. उस्मानाबाद) यांना ताब्यात घेतल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे 9 चे उल्लंघन झालेले असून गुन्ह्यासाठी वापरलेले फासे, जाळे, वाघर व मोटार सायकलसह दशरथ आडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक एल. ए. आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शीचे जे. जे. खोंदे, वनपरिमंडळ अधिकारी वाय. काझी, वनरक्षक एम. पी. शेळके, श्रीमती पी.बी. कोंबडे, श्रीमती ए.बी. सोनके यांच्या पथकाने केली.
0 Comments