Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात कोरोना रुग्णसंख्या कमी; पण मृत्यू काही थांबेनात

 सोलापूरात कोरोना रुग्णसंख्या कमी; पण मृत्यू काही थांबेनात


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे, परंतु मृतांची संख्या रोखण्यात प्रशासनाला अपेक्षित यश मिळालेले नाही. २१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात ग्रामीणमधील १८ तर शहरातील १९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’अंतर्गत सर्वांनी कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी, आजार अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
 शहरातील एक हजार २६२ संशयितांमध्ये बुधवारी (ता. २) ५३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे राघवेंद्र नगर (रामवाडी) येथील ७१ वर्षीय पुरुषाचा तर सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. सहा येथील ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शेळगी येथील कुमारस्वामी नगरातील ४८ वर्षीय महिलेचाही कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीणमधील माढ्यातील चव्हाणवाडी (टें.) येथील ७२ वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. शहरात सध्या दोन हजार ११ सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीणमधील सक्रिय रुग्णांची संख्या आता दोन हजार १६ झाली आहे. अक्‍कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या तालुक्‍यांमधील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. सध्या पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक ४३८ तर बार्शी तालुक्‍यात ३७४, माळशिरस व माढा तालुक्‍यात प्रत्येकी २२७, सांगोल्यात १७९, करमाळ्यातील १५५ तर मोहोळ तालुक्‍यातील १४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.नियमांचे पालन हाच ठोस उपाय कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी कोरोनासंबंधीचे नियम तंतोतंत पाळणे हाच ठोस उपाय मानला जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा नियमित वापर करणे आणि गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे. हाताची नियमित स्वच्छता असावी, असेही आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून कोरोना जीवघेणा ठरणार नाही, असा त्यामागे हेतू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments