वृध्दाश्रमातील वृध्दांची मोफत तपासणी
जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथकाचा वाद्य पुजन सोहळा उत्साहात साजरा.
बार्शी (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बार्शीच्या सांस्कृतिक चळवळीला पारंपरिक वाद्य सांस्कृतीची जोड देणारे जय भगवंत ढोल-ताशा,ध्वज पथकाचा वाद्य पुजन व भगवंत मुर्ती पुजन सोहळा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य दिपक गुंड, प्राचार्य गोरे, कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, काकासाहेब जगदाळे, प्रशांत खराडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांचे मोलाचे सहकार्य झाले. यावेळी पथक प्रमुख हर्षद लोहार, प्रविण परदेशी, अविनाश बोकेफोडे, जय भगवंतच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष देवकी जगताप, उपाध्यक्ष शुभम यंदे, कार्याध्यक्ष अक्षय काजळे, सचिव अबोली पालखे, सहसचिव संतोष चव्हाण, खजिनदार सुरज उबाळे, डिजिटल मीडिया प्रेस क्लबचे अध्यक्ष संदिप मठपती,योगेश लोखंडे, प्रदीप माळी, निलेश झिंगडे, मल्लिकार्जुन धारूरकर, विजय शिंगाडे, ओंकार हिंगमीरे तसेच ढोल पथकाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
0 Comments