छत्रपती ग्रुपच्या रक्तदान शिबिरात उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्या सोबत 261 युवकांनी आणि युवतीनी रक्तदान केले.
बार्शी (कटूसत्य वृत्त):- शिवजयंतीच्या (2022) निमित्ताने छत्रपती ग्रुप बार्शी यांनी आज दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन बार्शी चे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. या शिबिराच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, युवा उद्योजक अभिजित राऊत, बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, हृदयरोग तज्ञ आदित्य साखरे, मेंदू रोग तज्ञ डॉक्टर किशोर गोडगे ,बार्शी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष आबासाहेब बारबोले, बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अविनाश जाधव, बार्शी वकील संघाचे माजी अध्यक्ष दिनेश देशमुख, वकील संघाचे उपाध्यक्ष अजित पाटील, छत्रपती ग्रुपचे संस्थापक बापूसाहेब पाटील हे उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कृष्णाराज बारबोले, बार्शी मनसेचे शहराध्यक्ष विक्रम पवार बार्शी टाइम्सचे उपसंपादक दिनेश मिटकरी यांनी रक्तदान केले तसेच 261 रक्तदात्यांनी रक्तदान केले. उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना बार्शीचे आमदार यांनी छत्रपती ग्रुपच्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले आणि हे उपक्रम असेच चालू राहावे यासाठी शुभेच्छा दिल्या. उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून केलेल्या सामाजिक कार्य कार्याचे कौतुक केले.आणि त्याबद्दल त्यांनी माहिती दिली यामध्ये रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 2500 बाटल्यांचे संकलन आज पर्यंत झाल्याचे सांगितले. एकेठिकाणी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असलेले त्या तरुण पिढीला चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विजेता जिम सेंटर बद्दल त्यांनी विशेष उल्लेख केला. एक नवीन तरुण पिढी घडवण्याचे कार्य छत्रपती ग्रुप करत आहे असे असे त्यांनी सांगितले.
छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील यांनी बोलताना सांगितले की रक्तदान किती होतं यापेक्षा रक्ताच्या बाटल्या किती गरजू लोकांपर्यंत पोहोचतो हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि तो आम्ही येथून पुढेही करत राहू आणि यासाठी बार्शीतील रक्तपेढी यांचे आम्हाला खूप सहकार्य भेटते यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विजेता जिम सेंटरचे टीम तसेच छत्रपती ग्रुपचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते या रक्तदानासाठी बार्शी मधील भगवंत रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले.
0 Comments