Ads

Ads Area

मराठा सेवा संघ राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' राबविणार अभियान

 मराठा सेवा संघ राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' राबविणार अभियान





चिखली (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मराठा सेवा संघाच्यावतीने दशरात्रोत्सव उत्सव साजरा करण्यात येतो. मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील हा उपक्रम आता राज्य शासनाच्यावतीने राज्यभरात राबविला जाणार आहे. याअनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' अभियान राबविण्याचे निर्देश एका परिपत्रकाद्वारे राज्य शासनाने दिले आहेत. या उपक्रमअंतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ३ ते १२ जानेवारी या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यानुषंगाने ३ ते १२ जानेवारी दरम्यान शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांबाबतची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे दोन ते ते तीन मिनिटांपर्यंतचे सुस्पष्ट व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य फेसबुक, ट्रिटर, इन्स्टाग्राम, आदी माध्यमांवर अपलोड करण्यात यावा, असे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे.

२००१ पासून 'सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव'
सन १९९० मध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केल्यानंतर १२ जानेवारी १९९६ मध्ये मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळावर प्रथमच जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला होता. २००० पर्यंत १२ जानेवारीचा जिजाऊ जन्मोत्सव एकदिवसीय कार्यक्रम होता. २००१ पासून सिंदखेडराजा येथे ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते १२ जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव दरम्यान दशरात्रोत्सव राबविण्याची संकल्पना पुढे आली. तेव्हापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सिंदखेडराजा येथे निरंतरपणे 'सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव' साजरा केला जातो. बुलडाणा जिल्ह्यातील या उपक्रमाची दखल आता राज्य शासनानेही घेतली आहे. दशरात्रोत्सवाच्या धर्तीवर राज्यभरातील शाळांमध्ये 'जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा' हा उपक्रम यापुढे राबविला जाणार आहे.

मराठा सेवा संघाकडून निर्णयाचे स्वागत
राज्य शासनाच्या या निर्णयाचे मराठा सेवा संघाने स्वागत केले आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा जिल्हा दोद्यादरम्यान यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. यापृष्ठभूमीवर सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर व माजी आ. रेखाताई खेडेकर यांनी शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, तसेच खा. सुळे, ना. वर्षा गायकवाड, तसेच मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close