Ads

Ads Area

सोलापूरात तब्बल ३७८ कोटींची महापालिकेची कर थकबाकी, आता थेट लिलाव काढून थकबाकी वसूल मोहीम

 सोलापूरात तब्बल ३७८ कोटींची महापालिकेची कर थकबाकी, आता थेट लिलाव काढून थकबाकी वसूल मोहीम



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात जुनी तब्बल 378 कोटींची कर वसुलीची थकबाकी असून चालू थकबाकी 70 कोटी आहे. अशी एकूण 448 कोटी मिळकत कर थकबाकी असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी येत्या तीन महिन्यात थकबाकी 'क्लीनअप' करण्याची भूमिका मांडली.


महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर थकबाकी वसूल होण्यासाठी पुन्हा अभय योजना राबविणार अशी माहिती दिली. 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान कर भरल्यास दंड आणि शास्तीच्या रकमेमध्ये 60 टक्के सूट देण्यात येणार आहे, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान कर  भरणार्‍या नागरिकांना 50% तर एक मार्च ते 31 मार्च दरम्यान कर भरणाऱ्या नागरिकांना 40 टक्के पर्यंत शास्ती व दंडाच्या रकमेत सूट दिली जाणार असल्याचे शिवशंकर यांनी सांगितले.


सोलापूर शहरांमध्ये दोन लाख 35 हजार मिळकती व  प्रॉपर्टी असून 68 हजार ह्या मिळकती खुल्या जागेचा आहेत त्यापैकी दहा लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांमध्ये सुमारे पन्नासच्या वर मिळकतदारांचा समावेश आहे. येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये मिळकतकराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल केली जाणार आहे त्यासाठी काही महिन्यांमध्ये सोलापूर शहर क्लीन-अप दिसेल अशी भूमिका शिवशंकर यांनी मांडली. ज्या मिळकतदारांच्या उताऱ्यावर बोजा चढविण्यात आला आहे तरीही त्यांनी थकबाकी भरली नाही अशा मिळकती लिलाव करुन थकबाकी वसूल करणार असल्याचा इशारा आयुक्त शिवशंकर यांनी दिला.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close