डॉ. अमोल कोल्हे चूकच- पुरुषोत्तम खेडेकर
चिखली (कटूसत्य वृत्त):- डॉ.अमोल कोल्हे हे एक उत्तम नट व कलाकार आहेत. फुले शाहू आंबेडकर यांच्या संकल्पनेतील परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल असे काम करताना दिसतात. या परिवर्तनवादी सत्यशोधक विचारांचे समर्थक व संरक्षक आहेत.बालपणापासूनच त्यांच्यावर फुले गांधी यांचे संस्कार झाले आहेत असे ते सांगतात . तसेच आचरणातून दिसून येते . हे खरे असले तरी डॉ अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ही भूमिका करणे चुकीचे आहे . कारण ते ज्या विचारांचे वाहक आहेत त्या विचारात नथुराम गोडसे हे नांव तोंडी असणेही प्रतिगामी शक्तींना ताकद देते . डॉ. अमोल कोल्हे यांना नथुराम गोडसेचे डायलॉग चित्रपटात काय बोलणार ?? हे न वाचता सांगायची गरज नाही . यासाठी कलाकार अगोदरच कथानक समजून घेतात . नथुराम गोडसे याच्या तोंडी महात्मा गांधी विरोधात डायलॉग असणार .. हे अडाण्यालाही समजू शकते . नट म्हणून असे व्यवसाय करायला हरकत नाही ... पण ते विचारांचे विरोधात आहेच . यात शंका नाही . उदाहरणार्थ सांगायचे झाले तर आजही मराठीतील अनेक ब्राह्मण नट नट्या शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा जयघोष करत असताना दिसतात . पण जर त्यांना ब्राह्मणवाद विरोधातील भूमिका दिली तर ते नाकारतात . एवढेच नाही तर चालू शूटिंग वा नाट्य प्रयोगातून बाहेर पडतात . असे डॉ अमोल कोल्हे यांचेही एकेकाळी म्हणणे होते . यालाच विचारांची बांधिलकी म्हणतात ..अशा परिस्थितीत डॉ अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे भूमिका करणे म्हणजेच गांधी विचारांचा विरोध व नथुराम गोडसे विचारांचा पुरस्कार व प्रचार असेच होते ....डॉ अमोल कोल्हे , फुले शाहू आंबेडकरी विचारांचे नावाखाली काम करणाऱ्या कोणालाही नथुराम गोडसे हे नाव सन्मानाने उच्चारणेही अपेक्षित नाही . हे तुम्हाला ही माहित आहे. तुम्ही तर सरळपणे नथुराम गोडसे ह्या भूमीकेतून महात्मा गांधी यांच्या विरोधात गरळ ओकणार आहात ... किंवा ओकली असणार ... WHY I KILLED GANDHI ?? ह्या नावावरूनच ह्या चित्रपटात गांधी खलनायक तर गोडसे नायक हिरो ठरणारच , हे स्पष्ट होते . तुमच्या कलेतून तुम्ही एका खुन्याचे उदात्तीकरण व दैवतीकरण करणार आहात. अशा भूमिकांना चॅलेंजिंग म्हणताच येणार नाही . सन २०१७ मध्ये तुम्ही ही भूमिका साकार केली आहे. असे सांगून तुम्ही तुमच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या असंख्य पुरोगामी कलाप्रेमींचे मन दुखावले आहे असे म्हणायला हरकत नाही .....डॉ अमोल कोल्हे , तुम्ही आपल्या भूमीकेचे समर्थन करणे साहजिकच आहे . परंतू कलाकार दोन प्रकारचे असतात असे लक्षात येते . पहिले पूर्ण धंदेवाईक कलाकार . तर दुसरे तत्वनिष्ठ कलाकार.आम्ही तुम्हाला तत्वनिष्ठ कलाकार समजत होतो . राम रावण , शिवाजी औरंगजेब ही उदाहरणे जनसामान्यांच्या पदरी पडत नाहीत हेच खरे आहे . आम्ही तुमच्या सोबत नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही शेवटी खेडेकर म्हणाले.
No comments:
Post a Comment