केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या विरोधात सरकारची सुडबुध्दीने कारवाई - प्रविण दरेकर
मुंबई (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्यावर सुरु असलेल्या पोलिस कारवाईबद्दल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूडबुध्दीने कारवाई करुन त्यांना जेरीस आणण्याचा सरकार पुरस्कृत पोलिसांचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यावर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा याबाबत सभागृहात आपली भूमिका मांडली. तरीही तोच राग मनात ठेवून सरकारच्या दबावामुळे पोलिस नितेश राणे यांच्याविरुध्द कारवाई करीत आहेत.असा आरोप दरेकर यांनी केला आहे. ज्या दिवशी उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री आणि पालक मंत्री कणकवलीत होते, त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे काही करून या ठिकाणी नितेश राणे यांना ताब्यात घ्यावे, अशा प्रकारची सूचना दिल्याची माहिती असल्याचा दावा दरेकर यांनी केला . केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुध्दा नोटीस पाठवायची व त्यांच्याविरुध्द दबाव निर्माण करायचा असा सरकार पुरस्कृत पोलिसांचा कार्यक्रम आहे. झालेल्या हल्ल्याचे समर्थन आम्ही करत नाही, जे आरोपी असतील त्यांना पकडा व दोषींवर कारवाई करा. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत असून ती बॅंक सतिश सावंत यांच्या ताब्यातून ती राणे यांच्याकडे पर्यायाने भाजपाकडे जाईल अशी आघाडी सरकारला भीती आहे.असे दरेकर म्हणाले.
0 Comments