Hot Posts

6/recent/ticker-posts

अजित पवार पहाटे शपथविधीला जाणार हे आम्हाला आधीच माहित होतं - संजय राऊत

 अजित पवार पहाटे शपथविधीला जाणार हे आम्हाला आधीच माहित होतं - संजय राऊत



नाशिक (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते, असे शरद पवार यांनी सांगितले. त्याची आपणास कल्पना होती.

त्यावेळी आमच्यात पारदर्शकता होती त्यामुळेच आमचे सरकार बनू शकले. एवढेच नव्हे तर अजित पवार शपथविधीला जाणार असल्याची माहितीही आम्हाला होती, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी येथे पत्रकारांना दिली.

पवार सांगत आहेत त्याअर्थी ते खरं आहे. कारण त्यावेळी भाजपला काहीही करुन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग फोडाफोडी करण्यासाठी आमच्या लोकांना गाठा, अजित पवारांना गाठा असे त्यांचे कार्यक्रम सुरु होते, असेही राऊत म्हणाले.

शरद पवार यांना ऑफर होती आणि कोठे काय बोलणी सुरु होती याची आम्हाला माहिती आहे. त्या काळात आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे पारदर्शकता होती मात्र, याची भाजपाला माहिती नव्हती. त्यामुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही, असे सांगून राऊत म्हणाले, अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती.

ते म्हणाले की, मी असं म्हणतोय की पारदर्शकता होती. राजकारणात पारदर्शकता असायला हवी. इतकी मोठी घडामोडी घडत असताना कोण काय करत आहे? उद्या काय होणार? संध्याकाळी काय होणार?आपण महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन घडवण्यासाठी चाललो होतो. कुठेही कोणता दगड आडवा येईल, तो काढत राहिलो. आमच्याकडे तेव्हाही जेसीबी चालूच होत्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पारदर्शकता असल्याने सगळे आमदार आणि अजित पवार परत आले असंही वक्तव्य त्यांनी केलं.

लग्नं, मुहूर्त आधीच ठरले असून लोक नियमांचं पालन करत असल्याचं मी पाहिलं आहे. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांनी अनेक लग्नांमध्ये हजेरी लावली. मीदेखील त्यांच्यासोबत होतो. प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांनादेखील लागण झाली असून आपण काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.

Reactions

Post a Comment

0 Comments