निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 29, 2021

निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

 निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ


मुंबई (कटूसत्य वृत्त) :- वारंवार आवाहन करुनही एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यां पासून ठाम असलेले संपकरी कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. एसटी प्रशासनाने आणखी १७४ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ झाली आहे.
एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपाचा वाद अधिक वाढत चालला आहे. दोन महिने होऊन गेले तरी सुद्धा संप सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने आतापर्यत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १० हजार ७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कामगारांना आतापर्यत मंडळाकडून दोनदा संधी देण्यात आलेली होती. मात्र,संधी देऊन सुद्धा निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसता ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजवाली आहे. तर महामंडळाने १७४ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४१५ वर पोहचली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages