Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात आरोग्याचा कार्यक्रमावर अधिक भर ; जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कुर्डूवाडीत आढावा बैठक

 जिल्ह्यात आरोग्याचा कार्यक्रमावर अधिक भर
१ ते ८ वयोगटातील मुलांची ८० टक्के सर्वरोग तपासणी पूर्ण
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कुर्डूवाडीत आढावा बैठक

          कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- शैक्षणिक दृष्टिकोनातून वयवर्ष १ ते ८ वयोगटातील लहान बालकांच्या आरोग्याचा कार्यक्रमावर जिल्ह्यात अधिक भर असून कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील एकूण ९ लाख ७७ हजार लहान मुलांची सर्वरोग तपासणी सुरू आहे यापैकी ६ लाख ८० हजार बालकांची सर्व आजारांची तपासणी पूर्ण करण्यात आले आहे.यामध्ये ८० लहान मुलांना हृदयविकाराचा आजार असल्याचे ही आढळून आले आसल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

          ते माढा तालुका पंचायत समिती कार्यालय कुर्डूवाडी येथे विठ्ठलराव शिंदे सभागृहामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची व कर्मचार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेण्यासाठी आले होते याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, पुढे बोलताना ते म्हणाले, स्वच्छ शाळा व सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार शाळांनी सहभाग नोंदवला असून जिल्ह्यातील बऱ्याच शाळांबाबत पहाणी दौरा या निमित्ता ने माढा तालुक्यातील अरण,बावी व रोपळे येथील शाळांना भेट दिल्याचे ही त्यांनी सांगितले.

          यामध्ये जिल्हा परिषद कडील आर्थिक फंड न वापरता शिक्षक व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून हा स्तुत्य उपक्रम राबविला जात असून शाळांची रंगरंगोटी व बोलक्या भिंती तसेच परिसराची स्वच्छता या माध्यमातून पाहायला मिळत असून हे अभियान यशस्वीपणे सर्वत्र राबविले जात आहे याबद्दल त्यांनी सर्व सहभागी शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुकही केले आहे.

          या बैठकीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, शिक्षक शाळेला न जोडणे, मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हा आढावा घेतला आहे.

          यावेळी गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती विस्ताराधिकारी व एच.डी.ओ तसेच केंद्रप्रमुख सुपरवायझर ग्रामसेवक व पंचायत समितीतील विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments