Hot Posts

6/recent/ticker-posts

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम व्हावे--मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

 बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम व्हावे--मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी


सांगोला येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन


सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत  तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती सांगोला उमेद अंतर्गत सक्षम महिला प्रभाग संघ कडलास च्या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव निमित्त  स्थापन  केलेल्या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन जिल्हा परिषद सोलापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर चंचल पाटील मॅडम व स्मिता पाटील मॅडम सभापती राणीताई कोळवले, उपसभापती नारायण जगताप,जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, प्रभारी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मंडवळी मॅडम व जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे व राहुल जाधव तसेच प्रभागातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम आठवडी बाजार चे उद्घाटन प्रभाग संघ कार्यालयाचे उद्घाटन व nretpअंतर्गत स्थापन केलेल्या तालुका उद्योग विकास केंद्र कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी  हेमंत वसेकर साहेब उपस्थित होते. 

यावेळी सक्षम महिला प्रभाग संघ कडलास ची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमामध्ये बोलताना  दिलीप स्वामी  यांनी प्रभाग संघाच्या कामाचे कौतुक करताना पुढील कामकाज शुभेच्छा दिल्या, यावेळी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.तसेच राज्य व्यवस्थापन कक्ष मुंबई चे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांनी यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी चार गटांना एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषाताई येलपले,सचिव राजक्का काटे कोषाध्यक्ष मैनाताई केदार प्रभाग संघ व्यवस्थापक मेघाताई ऐवळे,लीपिका सुरेखा काटे व तालुका स्तरावरील कर्मचारी तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील bm ibcb दीपमाला सोमाणे अमोल सावंत,bm mis महंतवीर घाडगे ,bc of सुधीर पिसे,महेश साठे ,किशोर बिडे, अभिजीत महादेवकर, राहुल माने ,सचिन भोसले, दिपक गाडे, अजित वाघमारे, पंचरत्न राजपाल यांनी परिश्रम घेतले तसेच.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  जिल्हा अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मंडळी मॅडम यांनी केले व सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन तालुका अभियान व्यवस्थापक कुणाल पाटील यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments