नेहरू नगर परिसरात सुविधांचे वाजले तीन तेरा,नागरिक रस्त्यावर शौचास बसण्याच्या तयारीत

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डुवाडी शहरातील नेहरूनगर येथील धोकादायक सार्वजनिक महिला शौचालय पाडून नवीन शौचालय बांधणे तसेच ओढ्यावरील काढून टाकलेले दहा फुटी स्लॅब त्वरित टाकण्यात यावे अशी मागणी मातंग एकता आंदोलन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहरुनगर शाखेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेमार्फत प्रांताधिकारी ज्योती कदम यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मनसे शाखाध्यक्ष गणेश खिलारे मातंग एकता आंदोलन माढा तालुकाध्यक्ष रोहित कांबळे अमन कांबळे, राजेंद्र भिसे, सचिन कांबळे संदीप मोरे कांबळे मंगेश खिल्लारे आनंद खिलारे मंगेश कांबळे सुरज अस्वरे, विशाल कांबळे यांचेसह मनसेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षभरापासून शौचालयातील सेफ्टी लिकेजच्या टाक्याची दुरावस्था झालेली आहे व चोहीकडे दुर्गंधीने ग्रासले आहे पसरलेल्या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येताहेत नगरपरिषदेने नेहरू नगर परिसरातील नागरिकांच्या समस्येकडे त्वरीत लक्ष घालून समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याबरोबर येथील रहिवासी कुर्डूवाडी-टेंभूर्णी रस्त्यावर शौचास बसतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments