शेकाप आणि आनंद माने गट नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकत्रित लढणार--चंद्रकांत देशमुख

सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार-आनंद माने


सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज दि. 27 सप्टेंबर रोजी सायं. 7 वाजता शेतकरी कामगार पक्ष कार्यालय येथे शेकाप व आनंदा माने गट यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती, या निवडणुकीत मागील सर्व भेदभाव विसरून आनंद माने गट आणि शेकाप पूर्ण ताकदीने लढविणार असून आनंद माने यांच्या गटाने शेकापबरोबर युती केल्याने नगरपालिका निवडणुकीत चुरस पहावयास मिळणार आहे.सदर पत्रकार परिषदेस शेकापचे युवा नेते चंद्रकांत देशमुख,डॉ बाबासाहेब देशमुख, डॉ अनिकेत दादा देशमुख, गटनेते आनंद माने,नगराध्यक्षा राणी ताई माने,जि प सदस्य दादासाहेब बाबर,चेअरमन गिरीश गंगथडे,नगरसेविका छायाताई मेटकरी,स्वातीताई मगर,माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर,माजी नगराध्यक्ष डॉ प्रभाकर माळी,उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर,नगरसेवक अस्मिर तांबोळी,सुरेश माळी, रफिक तांबोळी,गजानन बनकर,विजय शिंदे,बाळासाहेब एरंडे,ऍड भारत बनकर,युवा नेते वैभव केदार,बिरा शिंगाडे,इंजि रमेश जाधव,राजू मगर,गोविंद माळी,ऍड संजीव शिंदे,बाळासाहेब झपके,दीपक चौथे,भीमराव दौंडे,तसेच शेकापआणि आनंद माने गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments