पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरचिटणीस योगेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

101 रक्तदात्यांनी केले उस्फुर्त रक्तदान

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरचिटणीस योगेश पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी माढा तालुका यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कै.सुरेश बापू पाटील प्रतिष्ठान पडसाळी व भारतीय जनता पार्टी माढा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. विविध समाजोपयोगी उपक्रम करून जन्मदिवस साजरा करण्याचे आदेश प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून प्राप्त झाले असल्याने पुढील एकवीस दिवस सेवा सप्ताह आयोजित करून नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन पडसाळी येथे करण्यात आले. या रक्तदान शिबिरास माढा विधानसभा शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे,सरचिटणीस डी.एम.मोरे,युवा मोर्चा सरचिटणीस गिरीश ताबे,भाजपा चिटणीस प्रकाश चोपडे,राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष निखील मोरे,भाजपा तालुका उपाध्यक्ष सतिश चोपडे,प्रा. ननवरे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्रीशैल मोरे,शहाजी यादव,हर्षनंदन यादव, विठ्ठल पाटील, शरद खांडेकर तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. यावेळी दत्ता फरड, रामचंद्र मुटकुळे, कुर्मदास पाटील, सचिन पाटील, अशोक देशमुख, महावीर आबा मुटकुळे, भरत पाटील, महेश पाटील, दत्तात्रय देशमुख, आण्णासाहेब मुटकुळे, दिपक पाटील, नृसिंह सलगर, विकास माळी, हरी पाटील, अनिल देशमुख, खंडु मगर, काकासाहेब मगर, पिंटु सलगर, शिध्देश्वर देशमुख, जयकुमार मुटकुळे, भैया पाटील, सागर मुटकुळे, अजिंक्य पाटील, गणेश मुटकुळे, लखन पवार उपस्थित होते. पडसाळी आणि पंचक्रोशीतील अनेक रक्तदात्यांनी रक्तदानाच्या कार्यामध्ये भाग घेऊन रक्तदान केले रक्तदात्यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन लगेच रक्तदान स्थळी करण्यात आला. कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची भीषण टंचाई ब्लड बँकांना आहे या रक्तदान शिबिराच्या मुळे ही टंचाई काहीशी दूर करण्यात मदत झाल्याची भावना कुर्डुवाडी ब्लड बँकेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.यावेळी कुर्डुवाडी ब्लड बॅंकेच्या वतीने रक्तदान करुन घेण्यात आले.यावेळी शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी स्वत: ७० व्या वेळी रक्तदान करुन कार्यकर्त्यावर असणारे प्रेम व्यक्त केले.तसेच युवकांनी रक्तदान करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
0 Comments