सोलापूर पतसंस्था फेडरेशनला बंको तर्फे पुरस्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त): बँको पतसंस्था फेडरेशन सहकार परिषद २०२१ व बँको ब्ल्यू रिबनच्यावतीने दिला जाणारा पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षी सोलापूर जिल्हा सहकार पतसंस्था फेडरेशनला मिळाला. कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात झालेल्या समारंभात फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी सहकाऱ्यांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला. सहकार क्षेत्रातील पतसंस्थांना बळकटी आणण्यासाठी विविध उपाययोजना व कार्य सातत्याने जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने सुरु आहे. फेडरेशनच्या या कार्याची दखल घेऊन बँको पतसंस्था फेडरेशन सहकार परिषद व बँको ब्ल्यू रिबन यांनी सहकारी क्षेत्रात मानाचा मानला जाणारा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार सोलापूर पतसंस्था फेडरेशनला सलग तिसऱ्या वर्षी देण्यात आला. यावेळी कर्नाटकचे जनरल ऑफ पोलीस प्रवीण पवार, चिक्कोडीचे खासदार आण्णासाहेब जोल्ले, धनंजय गोखले, एस.पी. देशपांडे, अजय खेडकर, अविनाश जोशी, अशोक नाईक, अविनाश शिंत्रे-गुंडाळे, फेडरेशनचे उपाध्यक्ष श्रीशैल नशेट्टी आदी उपस्थित होते.
0 Comments